मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (20:32 IST)

देशात कोरोनाचा वेग वाढला, 24 तासांत 90 हजारांहून अधिक रुग्ण आढळले

Corona accelerated in the country
ओमिक्रॉन  व्हेरियंटमुळे भारतात कोरोना प्रकरणांचा मोठा स्फोट झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 90 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.
हा आकडा मागील दिवसाच्या तुलनेत 56 टक्क्यांहून अधिक आहे. यादरम्यान ओमिक्रॉनच्या प्रकरणांचा आकडा 2600 च्या पुढे गेला आहे. 
देशात सक्रिय प्रकरणांमध्येही मोठी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाची 90,928 प्रकरणे नोंदली गेली आहेत.
सध्या देशात कोरोनाचे 2 लाख 85 हजार सक्रिय रुग्ण आहेत. रिकव्हरी दरही मागील दिवसाच्या तुलनेत 97.81 टक्क्यांवर आला आहे. 
ओमिक्रॉन व्हेरियंटच्या एकूण प्रकरणांची संख्या आता 2630 झाली आहे. मात्र, यापैकी 995 रुग्ण बरे झाले आहेत.गेल्या 24 तासांत कोरोनाचे केवळ 19,206 रुग्ण बरे झाले आहेत. त्याच वेळी, दैनंदिन संसर्ग दर 6.43 टक्क्यांवर पोहोचला आहे.
एकूण प्रकरणांपैकी सक्रिय प्रकरणे 0.81 टक्के झाली आहेत. आतापर्यंत देशात कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 3 कोटी 43 लाख 41 हजारांवर गेली आहे.