शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (17:01 IST)

10 राज्यांतील या 27 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, केंद्र सरकारने पत्र लिहून दिला इशारा

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत केंद्र सरकार पूर्णपणे अलर्ट मोडमध्ये आहे. कोरोनाचे नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणाच्या दरम्यान राज्य सरकारांना सतत इशारा दिला जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लिहिलेल्या पत्रात 10 राज्यांतील 27 जिल्ह्यांत वाढत्या कोरोनाच्या रुग्णांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रात राज्यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास आणि खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.
 केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिव आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्यातील वाढत्या कोरोना प्रकरणांबाबत चेतावणी देण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांत या 10 राज्यांतील 27 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यांच्यावर कडक नजर ठेवण्याची गरज केंद्र सरकारने राज्यांना सांगितली आहे.
 केंद्राने या राज्यांसाठी जारी केलेली इशारे यादी दोन भागात आहे. यामध्ये पहिल्या भागात ज्या जिल्ह्यांचा सकारात्मकता दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात तीन राज्यांतील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. मिझोराम, केरळ आणि सिक्कीम अशी या राज्यांची नावे आहेत. त्याच वेळी, केरळ, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, पुडुचेरी, मणिपूर, पश्चिम बंगाल आणि नागालँडमधील इतर जिल्हे समाविष्ट आहेत, जेथे सकारात्मकता दर 5 ते 10 टक्के दरम्यान आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रात या राज्यांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती पावले उचलण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले आहे. या अंतर्गत, बाधित असलेल्या क्षेत्रात कंटेनमेंट झोन तयार करण्याचा निर्णय घ्यावे असे सांगण्यात आले आहे. यासोबतच कोविड क्लस्टर, नाईट कर्फ्यू सोबतच मोठ्या संख्येने लोकांचे एकत्र येणे थांबवण्यासही सांगण्यात आले आहे. यासोबतच विवाह समारंभ आणि अंत्यसंस्काराच्या वेळी लोकांची संख्या निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्याचेही पत्रात म्हटले आहे.