बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (15:41 IST)

लक्षणं असूनही कोरोना टेस्ट निगेटिव्ह ? मग हे उपाय करा

कोरोनाच्या या थैमानात वेगवेगळे प्रकरणं बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे लक्षणं दिसत असूनही रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. अशात निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीला धोका असून त्याच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. अशात रिर्पोट कोरोना निगेटिव्ह आली असेल तरी लक्षणं जाणवतं असतील तर हे करा-
 
आयसोलेशन
लक्षणं दिसत असणार्‍यांनी रिर्पोट केल्यापासूनच आयसोलेट व्हावं. सर्वात आधी लगेच स्वतःला आयसोलेट करा. नंतर रिर्पोट निगेटिव्ह असली तरी लक्षणं दिसत असतील तर वेगळं राहणे अधिक योग्य ठरेल. 
 
पुन्हा कोरोनाची टेस्ट
कोरोनाची लक्षणे असूनही पहिली रिर्पोट निगेटिव्ह आली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन परत कोरोनाची टेस्ट करण्याची गरज आहे. अनेकदा लवकर रिर्पोट केल्याने चुकीचा रिपोर्ट मिळण्याची शक्यता असते. कोरोनाची लक्षणे असतील तर पुन्हा टेस्ट करण्यास हरकत नाही. 
 
लक्षणांकडे लक्ष देणे
कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यावर स्वत:कडे दुर्लक्ष करु नये. लक्षणांकडे लक्ष असू द्यावे. सर्व लक्षणांची नोंद करुन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दिवसभरात किमान तीन वेळा तापमान, ऑक्सिजन लेवल, ब्लड प्रेश आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासत राहावी.
 
डॉक्टरांचा सल्ला
कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कोणती औषधं सुरु करावी वा नाही याबद्दल स्वतःच निर्णय न घेता योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.