संबंधित माहिती
- UEFA चॅम्पियन्स लीगमधील वर्णद्वेष: PSG आणि इस्तंबूल बासाकशीरच्या सामन्यादरम्यान वर्णद्वेषावरून भाष्य, खेळाडूंनी मैदान सोडले, सामना पुढे ढकलला
- वॉटर प्युरिफायर खरेदी करण्याआधी
- JKSSB Recruitment 2020: 7 डिसेंबर पासून सुरू होणार एसआय आणि इतर पदासाठी भरती
- कोणत्या महिन्यात देवाला कोणते फुल व्हावे, सुंदर माहिती
- राज्यात ४ हजार २६ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना कोरोना
शिवसेना नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खैरे यांनी स्वतः सोशल मिडीयावर ही माहिती शेअर केली.
चंद्रकांत खैरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी लिहिले, ''माझी आज कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असून कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून खाजगी रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल''. खैरे शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समृद्धी महामार्ग पाहणी दौऱ्यात सहभागी होते.
