बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (16:27 IST)

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. उदय सामंत गेल्या दहा दिवसांपासून विलगीकरणात आहेत. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली. उदय सामंत यांनी आपली प्रकृती चांगली असल्याचे सांगितले असून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. 
 
ट्विट करून माहिती देतांना त्यांनी सांगितले की, गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेल्या १० दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.