शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (21:52 IST)

कोरोना व्हायरस आकडेवारी : मुंबई, पुणे, महाराष्ट्रात कोरोनाचे आज किती रुग्ण?

महाराष्ट्रात मंगळवारी (25मे) 24,136 नवे कोरोना रुग्ण आढळले तर 601 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 36,176 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
 
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 3 लाख 14 हजार 368 इतकी आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 92.76% वर आला आहे.
 
राज्यात आतापर्यंत 56 लाख 26 हजार 115 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 52 लाख 18 हजार 768 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
 
आतापर्यंत 90 हजार 349 जणांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.