1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (08:35 IST)

राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत वाढ, 24 तासात 3900 नवीन रुग्ण

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे  रुग्ण आढळून येत असल्याने चिंता  वाढली आहे. राज्यात 3900 नवीन कोरोना बाधित  रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1306 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजारांच्या पुढेच येत आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटने देखील चिंता वाढवली आहे. राज्यात बुधवारी  85 नवीन रुग्ण आढळून आले आहे. ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मुंबईत अडीच हजार कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आल्याने मुंबईची चिंता वाढली आहे.
राज्यात आजपर्यंत 65 लाख 06 हजार 137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के झाले आहे. राज्यात आज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 6 कोटी 7 लाख 68 हजार 760 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 66 लाख 65 हजार 386 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.69 टक्के आहे. सध्या 14 हजार 065 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 1 लाख 22 हजार 906 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 905 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.