शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (23:45 IST)

Covid-19 India: 24 तासांत कोरोनाचे 1997 नवीन रुग्ण,सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1997 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर, सक्रिय रुग्णांची संख्या 30,362 वर आली आहे. तर, कालपर्यंत 32,282 सक्रिय कोरोना रुग्ण होते. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आता देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 4,46,06,460 झाली आहे. 
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आणखी नऊ जणांचा संसर्गाने मृत्यू झाला आहे. यानंतर मृतांचा आकडा 5,28,754 वर पोहोचला आहे. या नऊ प्रकरणांमध्ये केरळमधील तीन लोकांचाही समावेश आहे
 
उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या एकूण रुग्णांपैकी 0.07 टक्के आहे. गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत 1,920 ने घट झाली आहे. त्याच वेळी, रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.75 टक्के झाला आहे.
 
Edited By - Priya Dixit