सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : सोमवार, 10 जानेवारी 2022 (23:59 IST)

ओमिक्रॉन नंतर आता नवा व्हेरियंट डेल्टाक्रॉनचा धोका,येथे आढळले पहिले प्रकरण

कोरोना व्हायरसच्या एकामागून एक व्हेरियंट ने संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. दुस-या लाटेत भारत आणि जगावर वाईट परिणाम करणाऱ्या डेल्टा व्हेरियंटतून सावरल्यानंतर , सध्या ओमिक्रॉन चा धोका वाढत आहे. पण आता या दरम्यान आणखी एक व्हेरियंट  समोर आला आहे, ज्याचे नाव आहे 'डेल्टाक्रॉन'. एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की सायप्रसमध्ये डेल्टाक्रॉनचे नवीन कोरोना व्हायरस व्हेरियंट समोर आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की 'डेल्टाक्रॉन' ची अनुवांशिक पार्श्वभूमी डेल्टा व्हेरियंटसारखीच आहे, तसेच काही ओमिक्रॉन सारखे  म्युटेशन देखील आहे. म्हणूनच त्याला 'डेल्टाक्रॉन' म्हणतात.
 तज्ञ म्हणतात की हे चिंतेचे कारण नाही.  सायप्रसमधून घेतलेल्या एकूण 25 नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनचे 10 म्युटेशन आढळले. येथे एका अहवालात सांगितले आहे  की त्या पैकी 11 नमुने व्हायरसमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांचे होते, तर 14 सामान्य लोकसंख्येतील होते. सायप्रस विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी आणि आण्विक विषाणूशास्त्र प्रयोगशाळेचे प्रमुख  म्हणाले की, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये म्युटेशनची  फ्रिक्वेन्सी जास्त होती, हे नवीन प्रकार आणि रुग्णालयात दाखल होण्याचे संबंध दर्शवितात. या डेल्टाक्रॉन चे डेल्टा व्हेरियंट सारखीच अनुवांशिक पार्श्वभूमी आहे
ओमिक्रॉनमधील काही म्युटेशन देखील आहेत. नवीन व्हेरियंट सध्या चिंतेचे कारण नाही. आत्तापर्यंत या नवीन व्हेरियंटचे वैज्ञानिक नाव घोषित केलेले नाही.