गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 10 जानेवारी 2022 (16:16 IST)

राज्य पुन्हा कोरोनाच्या विळख्यात, 24 तासांत 44 हजारांहून अधिक रुग्ण

कोरोनाच्या विळख्यात अवघा देश येत आहे . सध्या कोरोना संपूर्ण देशात पसरत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन सर्वत्र थैमान करत आहे. या मध्ये  कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेला महाराष्ट्र तिसऱ्या लाटेत पुन्हा एकदा संसर्गाच्या विळख्यात येत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 44,388 रुग्ण आढळले असून, एका दिवसात एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात 24 तासांत 15,351 बरे झाले. नवीन अहवालानंतर राज्यातील कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 41 हजार 639 मृत्यू झाला आहे.सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रसार रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लावण्यात आले आहे .शाळा महाविद्यालये देखील 15 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आले आहे .