1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:57 IST)

राज्यात कालही ४४ हजार ३८८ नवे बाधित !

covid
दिवसभरात २०७ नव्या ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली
गेल्या आठवडाभरापासूनच राज्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग झपाट्याने वाढला असून, दररोज नवा आकडा धास्ती वाढविणारा ठरत आहे. आजही राज्यात दिवसभरात तब्बल ४४ हजार ३८८ नवे बाधित आढळून आले आहेत. तर १५ हजार ३५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असून, दररोज आकडा हा ४० हजारांपेक्षा अधिकच असल्याचे समोर येत आहे. त्यातच नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनेही चिंता वाढविली असून, देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रातही असल्याने, आरोग्य यंत्रणाही धास्तावली आहे.
 
आज दिवसभरात राज्यात २०७ ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात १२१६ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले असून, त्यातील ४५४ रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर २.०४ टक्के झाला आहे. राज्यात सध्या २ लाख २  हजार २५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत ६५ लाख ७२ हजार ४३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्के आहे.   सध्या राज्यात १० लाख ७६ हजार ९९६ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर २६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,-०५,४५,१०५ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
 
मुंबईत आजही मोठ्या प्रमाणात बाधित
मुंबईत आज १९ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत सध्या १ लाख १७ हजार ४३७ रुग्ण सक्रीय आहेत. मुंबईत सध्या १ लाख १७ हजार ३४७ रुग्ण सक्रीय आहेत.