देशात कोरोनाचा वेग अनियंत्रित, नवीन कोरोना रुग्णांची संख्या 1लाख 60 हजार
भारतातील कोरोनाचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. रविवारी नवीन कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्या पुढे गेला. एका दिवसात आढळलेल्या कोरोना बाधितांची ही सर्वात मोठी संख्या आहे. रविवारी 1,59,632 नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर 40,863 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 327 लोक मृत्यूमुखी झाले आहेत. डेली पॉझिटिव्हिटी दर 10.21% पर्यंत वाढला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 3,44,53,603आहे. तर 4,83,790 लोकांना या संसर्गजन्य आजाराने आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत एकूण 151.58 लसीकरण करण्यात आले आहे.कोरोनाचा हा वाढणारा वेग काळजीत टाकणारा आहे.