बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (08:37 IST)

सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्यात मंगळवारी ५ हजार ३६३ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. तर महाराष्ट्रात ७ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये ११५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातला मृ्त्यूदर २.६३ टक्के इतका झाला आहे.  
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ५४ हजार २८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख २८ हजार ९०७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर १३ हजार २३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात १ लाख ३१ हजार ५४४ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आज राज्यात ५ हजार ३६३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या १६ लाख ५४ हजार २८ इतकी झाली आहे.