मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 4 मे 2020 (08:22 IST)

राज्यात कोरोनाचे २११५ रुग्ण बरे होऊन घरी परतले

In the state
राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात ६७८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १२ हजार ९७४ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २११५ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाबाधीत ६७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १२ हजार ९७४ झाली आहे. तर एकूण १० हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७० हजार १३९ नमुन्यांपैकी १ लाख ५६ हजार ७८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२ हजार ९७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ८१ हजार ३८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार १५८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ५४८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २१, पुण्यातील ४, भिवंडीतील १, नवी मुंबईमधील १ मृत्यू आहे. झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ११ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी १३ जणांमध्ये ( ४८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.