या ५ रुग्णांचा मृत्यू डेल्टा प्लसमुळेच झाला असेल असं म्हणता येणार नाही :टोपे
राज्यात डेल्टा प्लसच्या ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र या ५ रुग्णांचा मृत्यू डेल्टा प्लसमुळेच झाला असेल असं म्हणता येणार नाही असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतरही काही रुग्णांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे. सध्या राज्यात ८० टक्के डेल्टाचे आहेत. मात्र काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी राजेश टोपेंनी डेल्टा प्लस रुग्णांच्या मृत्यूविषयी भाष्य केलं आहे. राज्यातील ५ रुग्णांचा मृत्यू डेल्टा प्लसमुळेच झाला आहे असे म्हणता येणार नाही. या रुग्णांच्या भूतकाळाची माहिती काढण्यात येत आहे. सध्या राज्यात ८० टक्के डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत. यामधील डेल्टा प्लस व्हेरियंटसचे ६६ रुग्ण आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यात सध्या डेल्टाचे ८० टक्के रुग्ण आहेत. यामधून डेल्टाचे रुग्ण किती म्युटेट होत आहेत. डेल्टा प्लस ६६ रुग्ण झाले जरी असतील तरी त्यांनी लस घेतली आहे का? कुठे त्यांना कोरोनाची लागण झाली? अशी सर्व माहिती घेत आहोत. असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तर एकुण १८ लोकांनी लसीकरण घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण ५ जणांचे मृत्यू झाले आहेत.
मुंबईतील एका महिलेला कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही डेल्टा प्लसची लागण झाली. महिलेचा मृत्यू २७ जुलै रोजी झाला असून २१ जुल रोजी कोरोनाची लागण झाली असल्याचे निदान झालं होते. महिलेला २४ जुलै रोजी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तीन दिवस उपचाही करण्यात आले मात्र २७ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा मृत्यू डेल्टा प्लस मुळेच झाला का याची तपासणी सुरु आहे.