शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (08:45 IST)

राज्यात 63 हजार ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात शुक्रवारी  6 हजार 686 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 5 हजार 861 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या 63 हजार ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 लाख 82 हजार 076 एवढी झाली आहे. त्यापैकी 61 लाख 80 हजार 871 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.85 टक्के एवढा झाला आहे.

महाराष्ट्रात सध्या 63  हजार 004 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात 158 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 34 हजार 730 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 5 कोटी 05 लाख 45 हजार 552 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 70 हजार 890 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 676 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.