राज्यात सध्या ३४ हजार ८८१ अॅक्टिव्ह केसेस

Last Modified रविवार, 31 मे 2020 (11:06 IST)
महाराष्ट्रात २९४० नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ९९ जणांचा मृत्यू
झाला आहे. आता राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६५ हजार १६८ इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण २१९७ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.राज्यात १ हजार ८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत २८ हजार ८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्याच्या घडीला ३४ हजार ८८१ अॅक्टिव्ह केसेस आहेत असंही आरोग्य विभागाने सांगितलं आहे.

राज्यातला करोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आता १७.५ दिवस झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट अर्थात रोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.७ टक्के एवढे आहे. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ६६० लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३५ हजार ४२० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. संस्थात्मक क्वारंटाइनसाठी ७२ हजार ६८१ बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात ९९ करोना रुग्णांचा गेल्या २४ तासांमध्ये मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये ६२ पुरुष तर ३७ महिला होत्या.

नोंदवण्यात आलेल्या ९९ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ४८ रुग्ण होते. तर ४९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. २ रुग्ण ४० वर्षे वयाखालील होते. ज्या ९९ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी ६६ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर स्वरुपाचे आजार होते. सोलापुरात करोनामुळे आठ जणांचा मृत्यूसोलापुरात शनिवार एकाच दिवशी करोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. नव्या १४ रूग्णांची नोंद झाली. एकूण रूग्णसंख्या ८६५ तर मृतांची संख्या ८३ वर पोहोचली आहे. सोलापुरात एकाच दिवशी करोनाबाधित आठ रूग्णांचा मृत्यू होण्याची पहिलीच वेळ आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी 12 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ तर ...

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी 12 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ तर 54 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ लस
सकाळी नऊ नंतर टोकन वाटप सुरु, गर्दी न करण्याचे आवाहन

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवण्याचे ...

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात ...

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार; चंद्रकांत पाटलांनी शिकवू नये- ...

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार; चंद्रकांत पाटलांनी शिकवू नये- खासदार संभाजीराजे
मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे माझी नेमणूक कोणाच्या सांगण्यावरून झालेली नाही, ...

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- अमोल ...

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- अमोल कोल्हे
खेड तालुक्यातील प्रास्तावित रेल्वे आणि रिंगरोड हे दोन्ही प्रकल्प आहेत. ठिकठिकाणी ...

निर्बंध असतानाही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

निर्बंध असतानाही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी
मागील काही दिवस सतत पावसाचा शिडकाव झाल्याने राज्यातील पर्यटन स्थळांचे सौंदर्य अधिक खुलून ...