1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (15:49 IST)

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण

Minister of State
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली. त्यांनी 'माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन.' असे ट्विट केले. 
 
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक नेत्यांना याआधी कोरोनाची लागण झाली होती. सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील यांनाही मध्यंतरी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरु असताना जिल्ह्यातील अनेक नेत्यांना कोरोनाने गाठले होते. पण, यातून सतेज पाटील बचावले होते.