रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (07:36 IST)

राज्यात रविवारी २,६७३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात रविवारी २,६७३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०,४४,०७१ झाली आहे. राज्यात  एकूण ३५,९४८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, आतापर्यंत ५१,३१० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५१ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४, रायगड ९, पुणे ४, नांदेड २, नागपूर ३, कोल्हापूर २ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३० मृत्यूंपैकी १६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १२ मृत्यू रायगड ९, पुणे २ आणि नागपूर १ असे आहेत.
 
तर  १,६२२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १९,५५,५४८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६७ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,४९,७७,६८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,४४,०७१ (१३.६५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७२,३११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.