गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : बुधवार, 19 मे 2021 (16:42 IST)

नाशिकचा कोरोना ग्राऊंड रिपोर्ट

-रत्नदीप रणशूर 
नाशिक पालिकेचे कोरोनासाठी पोर्टल, रुग्णासाठी बेड, रेमडेसिव्हीर कुठे आणि कसं मिळणार, हेल्पलाईन नंबरही 
नाशिक: देशातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्णसंख्या असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये नाशिकचा देखील समावेश आहे.नाशिक जिल्ह्याती कोरोना रुग्णसंख्या 2लाखांवर पोहोचली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सदरची संख्या कमी होत असताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी महापालिकेकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
   
*जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ४९ हजार ८७५रुग्ण कोरोनामुक्त 
*सद्यस्थितीत १८ हजार १३२ रुग्णांवर उपचार सुरू
*जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार ८७५  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज 
जिल्हासामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार ८७५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १८  हजार १३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ४ हजार १३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
 
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
*नाशिकग्रामीण मध्ये नाशिक २ हजार १२३, बागलाण ६०९, चांदवड ६१३, देवळा ५९५, दिंडोरी ६७१, इगतपुरी २०३, कळवण ५६१, मालेगाव ३६१, नांदगाव ३२३, निफाड १ हजार १६४, पेठ ८२, सिन्नर १ हजार २५९, सुरगाणा ३१५, त्र्यंबकेश्वर १९०, येवला २३८ असे एकूण ९ हजार ३०६ पॉझिटीव्हरुग्णांवर उपचार आहे. 
 
तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ७ हजार ४७०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३३६ तर जिल्ह्याबाहेरील २० असे एकूण १८ हजार १३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार १३७रुग्ण आढळून आले आहेत.
 
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*जिल्हयातरुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिकग्रामीण मधे ९१.७७ टक्के, नाशिक शहरात ९५.७६ टक्के, मालेगावमध्ये ८६.६५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६६  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण९४.०२ इतके आहे.
 
*मृत्यु :*नाशिकग्रामीण १ हजार ९९२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ७५४ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २८५ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार १३० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
 
*लक्षणीय :
◼️३ लाख ७२ हजार १३७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३लाख ४९ हजार ८७५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १८ हजार १३२ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.०२ टक्के. 
 
नाशिकमहापालिकेच्या वेबसाईट वर बेडस उपलब्ध पण, प्रत्यक्षपरिस्थिती वेगळी
नाशिकमहापालिकेने शहरातील बेडची संख्या दाखवण्यासाठी एक पोर्टल तयार केलं आहे.रुग्णालयांना त्यावर माहिती अपडेट करायला सांगितली आहे. मात्र, रुग्णालयांकडून माहिती अपडेट केली जात नसल्याने वेबसाईटवर बेड रिकामे दाखवते आणि रुग्णालयात पोहोचल्यानंतर प्रत्यक्षात बेड उपलब्ध नसतो.

http://covidcbrs.nmc.gov.in/home/hospitalSummaryही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. यावेबसाईटवर बेड उपलब्ध असल्याबाबत माहिती मिळेल. पालिकेने 9607623366 / 9607432233 / 0253-2317292/ 7030300300 हेक्रमांक दिले आहेत. 
 
नाशिकमध्ये640 बेड वाढवण्यात येणार नाशिक जिल्हासामान्य रुग्णालयात पूर्वी 110खाटांची क्षमता होती. तेथे आता 90बेड वाढविल्याने 200 बेडची क्षमता झाली आहे. तसेच बिटकोरुग्णालयात 300, तसेच नाशिकरोड येथील अग्निशमन दलाचीइमारत व भक्तनिवास या कोविड केअर सेंटरमध्ये 250असे एकूण 640 अतिरिक्त बेडची वाढ करण्यात येणार आहे. 
 
नाशिकमध्ये कोरोना चाचणी कशी होते?
एखाद्याला लक्षणे असली किंवा तो कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला असेल आणि त्याला टेस्ट करायचीअसेल तर नाशिक विविध ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते. नाशिकमध्ये टेस्ट करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळी केंद्र उघडली आहेत. त्या ठिकाणी RTPCR आणि अँटिजन टेस्ट केली जाते. सोबतच खाजगीरुग्णालय ज्यांना कोव्हिड रुग्णालय जाहीर केलं आहे, तिथे काही खाजगी लॅबमध्ये सुद्धा टेस्ट केली जाते.  
 
रेमडेसिव्हीरमिळतं का? त्यांचे दर, रुग्णालयांची फी वगैरे सगळं नाशिकमहापालिकेने या लिंकवर https://nmc.gov.in/article/index/id/172 रेमडेसिव्हीर इंजेक्शन कुठे मिळेलयाची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. 
 
नाशिक महापालिकेने दिलेली ही माहिती त्यानुसार 79 कोव्हिड रुग्णालय, 34 मेडिकल्सकडील उपलब्ध साठ्याची माहिती दिलीआहे. तर, 10 रिटेल विक्रेत्यांची माहिती शेअर केलीआहे. सध्या नाशिकमध्ये रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासत असून मेडिकलमध्ये रांगालागल्याचं चित्र पाहायला मिळालं. नाशिक जिल्हा प्रशासनानं नागपूरमधून रेमडेसिव्हीरऔषधं मागवली होती. 
 
टेस्टचारिपोर्ट येण्यासाठी किती वेळ लागतो? तोपर्यंत रुग्णाने काय करायचं?RTPCR टेस्टसाठी 1 ते 2तास लागतात. या चाचणीचा रिपोर्ट 24तासानंतर येतो. तर अँटिजन टेस्ट 20मिनिटात होते, आणि या चाचणीचा रिपोर्टही 1 ते 2तासात येतो. टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत रुग्णाला विलगीकरणात राहायचं असते. 
 
एखाद्याचारिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर रुग्णाने कुठे जायचं? महापालिकात्याला घेऊन जाते की स्वत:ला जावं लागतं. रुग्णाचाकोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एकतर रुग्णाला लक्षणे कमी असेल तरडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहता येते. लक्षणे जास्त असल्यासकोव्हिड केअर सेंटरला भरती करण्यात येते. सेंटरला रुग्ण स्वतः जाऊ शकतो किंवा माहिती दिल्यास महापालिका रुग्णवाहिका पाठविते. 
 
रुग्णांनाकुठे पाठवलं जातं?
कोव्हिडसेंटर किंवा तत्सम ज्यांनाखाजगी रुग्णालयात जायचं असेल ते तिकडे जाऊ शकतात किंवा मग कोव्हिड केअर सेंटरउभारले आहेत. नाशिकमध्ये रेमडेसिव्हीरसाठी रांगाकोरोनारुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा नाशिकमध्ये निर्माण झाला. नाशिकजिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना रेमडिसिव्हर मिळत नसल्याने रुग्णांचेनातेवाईक चांगलेच हैराण झाले आहे.