1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (17:21 IST)

Omicron : दिल्लीत 4 नवीन रुग्ण, देशात ओमिक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 45

दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे 4 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे राजधानी दिल्लीत आता ओमिक्रॉनचे एकूण 6, तर देशात 45 रुग्ण आहेत.
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी याविषयीची माहिती दिली. दिल्लीमधल्या 6 पैकी एका ओमिक्रॉन संसर्गबाधिताला हॉस्पिटलमधून रजा मिळाली आहे.
भारतातल्या ओमिक्रॉनग्रस्तांची संख्या सध्या 45 आहे.
यामध्ये महाराष्ट्रात 20, राजस्थानमध्ये 9, दिल्लीत 6, गुजरातमध्ये 4, कर्नाटकात 3, केरळमध्ये 1, आंध्र प्रदेशात 1 आणि चंदीगढमध्येही 1 ओमिक्रॉन रुग्ण आहे.
भारतात सगळ्यात आधी बंगळुरूमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला. भारतीय वंशाचा दक्षिण आफ्रिकन नागरिक आणि एका डॉक्टरसह दोघांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं आढळलं होतं.
 
सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्णसंख्या महाराष्ट्रात
महाराष्ट्रात 4 डिसेंबरला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण डोंबिवलीमध्ये आढळला. त्यानंतर आतापर्यंत महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 20 रुग्ण आढळले आहेत.
13 डिसेंबरला महाराष्ट्रात 2 नवीन ओमिक्रॉन रुग्ण आढळले होते. यापैकी एक लातूरमध्ये तर एक पुण्यात आहे.
 
महाराष्ट्रातली ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पण परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR रिपोर्ट गरजेचा नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय.
तर आंतरराष्ट्रीय प्रवशांबद्दल वेगळे नियम जाहीर करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिका, बोट्स्वाना आणि झिंम्बाब्वे या देशांना हाय रिस्क देश जाहीर करण्यात आलं आहे.
 
हाय रिस्क प्रवासी कोण?
· हाय रिस्क देशांमध्ये गेल्या 15 दिवसात प्रवास केलेले लोक
· हाय रिस्क देशातून येणारे प्रवासी
· हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR बंधनकारक
· 7 दिवस institution quarantine करावं लागणार. Positive असेल तर रुग्णालयात दाखल करणार
· 7 दिवसानंतर पुन्हा टेस्ट होणार. टेस्ट निगेटिव्ह आली तर 7 दिवस home quarantine
· इतर राज्यातून येणाऱ्यांना लशीचे दोन डोस अनिवार्य
· लस घेतली नसेल तर 72 तासांचा RTPCR टेस्ट