1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (11:11 IST)

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाव्हायरसच्या Omicron व्हेरियंटचे चित्र व्हायरल

नवी दिल्ली. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाव्हायरसच्या(Coronavirus) ओमिक्रॉन ((Omicron)) व्हेरियंटचे छायाचित्र मीडियामध्ये व्हायरल होत आहे. ओमिक्रॉनचे हे पहिले छायाचित्र असल्याचे बोलले जात आहे. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाही .
रोममधील बेम्बिनो गेसो हॉस्पिटलमध्ये केलेल्या संशोधनानंतर हे चित्र काढण्यात आल्याचे समजते. हे संशोधन प्रोफेसर कार्लो फेडेरिको पेर्नो यांनी संयोजित केल्याचे सांगितले जात आहे आणि मिलान स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर क्लॉडिया अल्टेरी यांनी या संशोधनाचे निरीक्षण केले. 
हे लक्षात घेण्यासारखे आहे की दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाव्हायरस ओमिक्रॉनचा एक नवीन व्हेरियंट समोर आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने याचे वर्णन अतिशय वेगाने पसरणारे असे केले आहे.
या प्रकाराबाबत जगभरात कोविड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंट बाबत दहशतीचे वातावरण आहे. WHO ने सोमवारी सांगितले की, कोविडचे हे नवीन व्हेरियंट  अत्यंत धोकादायक आहे. याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र, याबाबत कोणतीही प्राथमिक माहिती नसल्याने तो किती संसर्गजन्य आणि धोकादायक आहे, हे कळणे फार कठीण आहे.