1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (12:38 IST)

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंट ने चिंता वाढवली, लक्षणांपासून ते चाचणीपर्यंत, याबद्दल सर्वकाही जाणून घ्या

The omicron variant of the Corona raises anxiety
कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. ओमिक्रॉन नावाचा हा व्हेरियंट प्रथम दक्षिण आफ्रिकेत सापडला. जागतिक आरोग्य संघटनेनेही या नवीन व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. पुन्हा एकदा या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबर रोजी ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाली आणि 9 नोव्हेंबर रोजी गोळा केलेल्या नमुन्यातून प्रथम ज्ञात संसर्ग आढळून आला. अनेक देश Omicron चा प्रसार रोखण्यासाठी झटत आहेत आणि दक्षिण आफ्रिकेतील उड्डाणांवर बंदी घातली आहे,
हा व्हेरियंट  लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो हे जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केले आहे. या व्हेरियंटबद्दल आपली चिंता व्यक्त करताना, हे वेगाने पसरणारे व्हेरियंट असल्याचे म्हटले आहे. हे खूपच धोकादायक आहे आणि दोन्ही लसीकरण झालेल्या लोकांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. 
 
नवीन व्हेरियंट काय आहे?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरियंटअनेक स्पाइक प्रोटीन म्युटंट आहेत आणि ते अत्यंत संसर्गजन्य आहे. आतापर्यंत कोरोना महामारीचे अनेक व्हेरियंट समोर आले आहेत. शास्त्रज्ञ देखील या नवीन व्हेरियंटवर लक्ष देऊन  आहेत. असे मानले जाते की हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्तीला वेगाने पराभूत करण्यात सक्षम आहे आणि हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक व्हेरियंट असल्याचे बोलले जात आहे.
 
 या ओमिक्रोन व्हेरियंट ची  लक्षण काय आहे?
दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) ने म्हटले आहे की ओमिक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गासाठी कोणतीही असामान्य लक्षणे आढळून आलेली नाहीत." NICD ने असेही नमूद केले आहे की डेल्टा सारख्या ओमिक्रॉनची लागण झालेल्या काही लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. म्हणजे ते एसिम्टोमेटिक होते. ओमिक्रॉन संसर्ग देखील मागील प्रकाराप्रमाणेच लक्षणे दर्शवित आहे. उदाहरणार्थ, ताप, खोकला, वास किंवा चव कमी होणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, छातीत दुखणे इत्यादी लक्षणं आहेत.  
WHO च्या मते, सध्याचा SARS-CoV-2 PCR हा व्हेरियंट शोधण्यात सक्षम आहे. या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर, भारत देखील सतर्क झाला आहे, दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल आणि त्यांची चाचणी घ्यावी लागेल.