रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (08:55 IST)

राज्यात १ हजार ४३७ नव्या रूग्णांची नोंद

राज्यात रविवारी १ हजार ४३७ इतक्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात दिवसभरात ६ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. तसेच आज ३ हजार ३७५ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत एकूण ७६ लाख ९४ हजार ४३९ इतक्या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९१ टक्के एवढे झाले आहे.
 
राज्यात शनिवार १ हजार ६३५ इतक्या रूग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच २९ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु आज दिवसभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत आणि मृत्यूतही घट झाली आहे. राज्यात एकूण १६ हजार ४२२ ॲक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यात २,०४,९४२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर १०६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७२,३२,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,५८,४३१ (१०.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
 
राज्यात एकूण ४ हजार ४५६ इतके ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३ हजार ९८६ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ८ हजार ९०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७ हजार ९९१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. तसेच ९१३ नमुन्यांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.