बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 23 मार्च 2020 (17:41 IST)

महाराष्ट्रात आतापर्यंत 89 जणांना कोरोनाची लागण

देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 433 झाली आहे. तर आतापर्यंत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 50 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात देशभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 89 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक 39, पुणे 16, पिंपरी चिंचवड 12 रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली.
 
महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये 67 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीत 30 आणि उत्तरप्रदेशात 25  कोरोनाग्रस्त रुग्ण पाहायला मिळत आहे.
 
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, जम्मू काश्मीर, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेशात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. यासोबत उत्तरप्रदेशातील 16 जिल्हे 25 मार्चपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात येणार आहे.