बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : सोमवार, 4 मे 2020 (10:37 IST)

बेंगळुरू आणि पटियाळामध्ये महिन्याच्या अखेरीस ऑलिम्पिक प्रशिक्षण शिबिर सुरू करण्याचा विचार : किरण रिजिजू

आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठीची प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी  म्हटलं आहे. बेंगळुरू आणि पटियाळामध्ये ही शिबिरं सुरू होतील. मात्र अन्य प्रशिक्षण वर्ग सुरू होण्यासाठी  सप्टेंबर महिन्यापर्यंत थांबावं लागेल, असं ते म्हणाले. 

कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला देशव्यापी ताळेबंदीचा काळ १७ मे पर्यंत वाढवण्यात आल्यानं सर्व प्रशिक्षण  शिबिरं उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून टप्प्याटप्प्यानं ती सुरु केली जातील, असं ते म्हणाले.

कोविड १९ पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत कुठल्याही स्पर्धांचं आयोजन करता येणार नाही, त्यासाठी क्रीडा प्रेमींना थोडी वाट पाहावी लागेल, असं रिजिजू यांनी सांगितलं.