शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 18 एप्रिल 2020 (07:29 IST)

Coronavirus : टाटा ट्रस्टकडून देशासह राज्यालाही मोलाची मदत

कोरोनाच्या संकटसमयी टाटा ट्रस्टकडून देशासह राज्यालाही मोलाची मदत मिळत आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी गरजेच्या अत्यावश्यक वस्तू टाटा ट्रस्टकडून एअरलिफ्ट केल्या जात आहेत. टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या मार्फत या वस्तू पुरवल्या जात आहेत, टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी सोशल मिडीयावर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

टाटा ट्रस्टकडून पुरवल्या जाणाऱ्या वस्तू या प्रामुख्याने आरोग्य यंत्रणेशी निगडित आहेत. यात संपूर्ण शरीर झाकले जाईल असा संरक्षक सूट, एन ९५/केएन ९५ मास्क आणि विविध ग्रेड्सचे सर्जिकल मास्क, हातमोजे आणि गॉगल्स आदींचा समावेश आहे.