बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (22:01 IST)

स्वदेशी बनावटीचे तब्बल १० लाख कोरोना किटस बनणार

देशात कोरोना व्हायरसच्या  चाचणीसाठी किटसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मे महिन्यापर्यंत स्वदेशी बनावटीच्या तब्बल १० लाख किटसची निर्मिती करण्यात येईल. जेणेकरून देशभरात कोरोनाच्या चाचण्यांचा वेग वाढवता येईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. 

चीनमधून भारतात तब्बल ६.५ लाख किटस् आयात करण्यात आली होती. मात्र, भारताची लोकसंख्या पाहता ही किटस् अपुरी पडणार हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने आता देशातच ही किटस् तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.