1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 23 एप्रिल 2020 (16:15 IST)

50 हजारांहून अधिकांर्‍यांना शिवभोजन थाळीचा आधार

Shivbhojan plate
लॉकडाउनच कालावधीत जिल्ह्यात 50 हजारांहून अधिक लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. गरजू आणि गरीब लोकांना लॉकडाउनच्या कालावधीत आधार मिळावा, यासाठी शिवभोजन थाळी केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली होती.

तेव्हापासून आजपर्यंत 52 हजार 137 तर बुधवारी 2 हजार 246 लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण 26 शिवभोजन केंद्रे आहेत. त्यापैकी पाच शहरात तर 21 ग्रामीण भागात आहेत. जिल्ह्यासाठी एकूण 3 हजार 500 थाळींचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत शिवभोजन केंद्रामधून गरीब व गरजू लोकांना पुरविण्यात आलेल्या एकूण थाळींची संख्या 89 हजार 558 अशी आहे, असे शंभरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब आणि गरजू लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.