रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नागपूर , गुरूवार, 23 एप्रिल 2020 (14:13 IST)

देश कोरोनाच्या संकटात असताना राजकारणाचा डमरू वाजवू नये

आपला देश कोरोनाच्या संकटाशी लढतो आहे. अशात कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये असे वक्तव्य करत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

एक प्रकारे हे वक्तव्य करत त्यांनी अप्रत्क्षपणे राज्यातील भाजप नेत्यांचे कानच टोचले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सध्या देश कोरोनाच संकटाशी लढतो आहे. हे संकट हे देशावरचे सगळ्यात मोठे संकट आहे. या संकटात राजकारण करणे गैर आहे. राष्ट्रकारण आणि विकास यांना महत्त्व दिले पाहिजे. प्रत्येक संवेदनशील नेत्याने ही बाब लक्षात ठेवली पाहिजे असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. आपत्तीचे रूपांतर इष्टापत्तीत कसे करता येईल याचा विचार आपला देश करतो आहे. त्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत असेही गडकरींनी म्हटले आहे. मुंबई- पुण्यातली स्थिती गंभीर आहे. त्यामुळे तिथे कदाचित सगळे काही सुरळीत होण्यासाठी वेळ लागेल. तरीही मराष्ट्रातल्या ज्या भागांमध्ये रुग्ण नाहीत तिथे हळूहळू उद्योग आणि इतर व्यवहार सुरु करता येऊ शकतील असेही गडकरी यांनी म्हटले आहे.