सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (22:54 IST)

वडोदरामध्ये निरोप घेताना वधू बेशुद्ध झाली, पुन्हा उठूच शकली नाही,कोरोना पॉझिटिव्ह निघाली

वधू सासरी जाताना वातावरण खूपच भावनिक असते, चेहऱ्यावर आनंद तर असतोच परंतु डोळ्यातून अश्रूंचा पाझर वाहत असतो, पण वडोदरामध्ये एका कुटुंबावर आयुष्यभर रडण्याची वेळ आली आहे. या कुटुंबात आयुष्यभर वधूचा असा विदाचा समारंभ विसरणार नाही. कारण या कुटुंबात वधू बेशुद्ध होऊन कोसळली तर परत उठलीच नाही.
 
ही बाब शहरातील गोत्री परिसरातील आहे जिथे आनंद शोकात कधी बदलला हे कळलेच नाही. घरातून सासरी जाणाऱ्या एका नववधूला आयुष्यातून निरोप घ्यावा लागला. घरातून सासरी जाताना निरोप देण्याची वेळ होती प्रत्येकजण आनंदाने मुलीला सासरी जाताना निरोप देत असताना वधू कोसळून खाली पडून बेशुद्ध झाली. 
तातडीने तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत्यू नंतर तिचा शव विच्छेदनाच्या अहवालात तिला कोरोना असल्याचे समजले. तिचा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला.
 लग्नाच्या वेळीच मुक्ताला ताप होता: शहरातील गोत्री भागात राहणारी मुक्ता सोलंकी आणि  कृष्ण टाऊनशिप मधील हिमांशू शुक्लाचे एक मेकांवर प्रेम होते. या लग्नाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे की हे लग्न दोघांच्या कुटुंबाला मान्य होते. या दोघांचे लग्न 1 मार्च रोजी झाले होते. गुरुवारी मुलीचा निरोप समारंभ होता. या विदाईच्या समारंभात अपघात झाला. 
मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या वेळी मुक्ताला ताप होता. डॉक्टरांनी तिला तापाचे औषध दिले होते आणि मुक्ताला विश्रांती घेण्यास सांगितले होते. मुक्ताच्या तापामुळे तिचा विदाईचा कार्यक्रम 2 दिवस पुढे ढकलण्यात आला होता. वधूच्या जोड्यात बसलेली मुक्ताला भोवरी आली आणि ती जागेवरच कोसळून बेशुद्ध झाली.