अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 8 हजारावर आली
राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. राज्यातील कोरोनाची आकडेवारी हजाराच्या आत आली असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 8 हजारावर आली आहे. राज्यात शुक्रवारी 852 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 665 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 64 लाख 80 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.7 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 34 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 891 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर स्थिरावला आहे. सध्या राज्यात 8 हजार 106 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 51 लाख 55 हजार 293 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 32 लाख 723 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 78 हजार 122 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 1052 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.