राज्यात करोना मृत्यूंची संख्या थेट ३८८ वर

death corona positive
Last Modified बुधवार, 16 जून 2021 (08:00 IST)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये रोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांची संख्या ५०-६० हजारांवरून १० हजारांपर्यंत खाली आली आहे. मात्र, दररोज ही आकडेवारी सातत्याने कमी होताना न दिसता मध्येच वाढतानाही दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात झालेल्या करोना मृत्यूंची संख्या थेट ३८८ च्या घरात गेली आहे. सोमवारी हाच आकडा २०० इतका नोंदवण्यात आला होता. तिथे दुसरीकडे नव्या करोनाबाधितांचा आकडा देखील कालच्या ८ हजार १२९ वरून जवळपास १२०० नी वाढून ९ हजार ३५० पर्यंत गेला आहे.
मंगळवारी राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्याचा मृत्यूदर १.९३ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३८८ करोना मृत्यूंची नोंद करण्यात आली असून एकूण करोना मृतांचा आकडा आता १ लाख १४ हजार १५४ इतका झाला आहे. त्याचवेळी राज्यात ९ हजार ३५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात करोनाची बाधा झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ५९ लाख २४ हजार ७७३ इतका झाला आहे. त्यापैकी सध्या राज्यात १ लाख ३८ हजार ३६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज राज्यात करोनावर मात करून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा १५ हजार १७६ इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत करोनावर मात केलेल्या राज्यातल्या रुग्णांची संख्या ५६ लाख ६९ हजार १७९ इतकी नोंदवण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर आहेत : नितेश राणे

उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर आहेत :  नितेश राणे
भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर ...

करुणा शर्मा यांचा अखेर जामीन मंजूर, २५ हजारांच्या ...

करुणा शर्मा यांचा अखेर जामीन मंजूर, २५ हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून सुटका
बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी ...

बर्गरमध्ये विंचू, अर्धा भाग चघळल्यानंतर तरुणाची पडली नजर, ...

बर्गरमध्ये विंचू, अर्धा भाग चघळल्यानंतर तरुणाची पडली नजर, घाबरत रुग्णालयात पोहोचला
राजस्थानची राजधानी जयपूरच्या मालवीय नगरमध्ये असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये काल रात्री गोंधळ ...

शिवसेनेच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता : प्रवीण दरेकर

शिवसेनेच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता : प्रवीण दरेकर
सरकार आघाडी सांभाळेल, तुमची आपली जबाबदारी काय आहे तर आपल्याला गाव सांभाळायचा आहे. हे गाव ...

गीते यांच्याविधानावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा ...

गीते यांच्याविधानावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा  पलटवार
शिवसेना नेते अनंत गीते यांनी शरद पवार आमचे गुरू होऊच शकत नाही, असं विधान केलं आहे. गीते ...