शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (08:30 IST)

राज्यात नवीन बाधितांचा आकडा हजाराखाली

राज्यात सोमवारी १ हजार ९०१ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, ८०९ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, दहा करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे.तर  १ हजार ९०१ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, आजपर्यंत एकूण ६४,५२,४८६ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९७.५९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात  एकूण १५,५५२ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.८०९ नवीन कोरोनाबाधित आढळले, राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६६,११,८८७ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १४०२२६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.