1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 14 एप्रिल 2020 (09:38 IST)

मुंबईतील नामवंत डॉक्टर्स 'कोरोना' लढाईत शासनाबरोबर

The renowned doctors
कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला असून मुख्य सचिवांच्या पातळीवर या डॉक्टर्सचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे डॉक्टर राज्यभरातील कोरोना उपचार करणाऱ्या डॉकटर्सना हॉट लाईनच्या माध्यमातूनही उपलब्ध असतील.

आज या डॉक्टर्सशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला व टास्क फोर्सने करावयाच्याया कामांबाबत सूचना ऐकून त्याप्रमाणे कार्यवाहीचे प्रशासनाला निर्देश दिले.

या टास्क फोर्समध्ये खालील डॉक्टर्स असतील

महाराष्ट्रात आजपर्यंत 2 हजार पॉझिटिव्ह रुग्ण असून 150 मृत्यू आहेत. मृत्यू दर 6 ते 7 टक्के असून 80 टक्के अशा रुग्णांना किडनी, उच्च रक्तदाब, किंवा इतर दुर्धर आजार होते.
राज्यातला वाढता मृत्यू दर चिंतेचा विषय असून तो कमी करणे नव्हे तर एकही व्यक्ती मरण पावली नाही पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

या टास्क फोर्समध्ये खालील डॉकटर्स असतील,

डॉ.संजय ओक, डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. झहीर उडवाडिया, हिंदुजा रुग्णालय.
डॉ . नागांवकर, लिलावती रुग्णालय .
डॉ . केदार तोरस्कर , वोक्हार्ट रुग्णालय .
डॉ . राहुल पंडित, फोर्टीस रुग्णालय .
डॉ . एन.डी. कर्णिक, लोकमान्य टिळक रुग्णालय शिव .
डॉ . झहिर विरानी , पी . ए .के. रुग्णालय .
डॉ . प्रविण बांगर, केईएम रुग्णालय .
डॉ . ओम श्रीवास्तव, कस्तुरबा रुग्णालय .

 ही टीम एकीकडे राज्य शासनाला वैद्यकीय उपचारांबाबत सुयोग्य मार्गदर्शनही कारातील तसेच राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आळीपाळीने हॉट लाईनवर सहाय्य करतील.

डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करणे, या रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, प्रत्येक रुग्णाला तो कोविडग्रस्त समजून उपचार सुरू करणे, चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका, कोविड आयसीयूमधील उपचार पद्धती यावर व अनुषंगिक उपचारांवर  ही टीम देखरेखाही ठेवेल तसेच सल्ला देईल.