1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (08:35 IST)

राज्यात मंगळवारी २,५१५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

The state registered 2
राज्यात मंगळवारी २,५१५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०,४८,८०२ झाली आहे. राज्यात ३४,६४० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५१,३६० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५१ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ३५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३, नवी मुंबई २, अहमदनगर ३, नाशिक २, पुणे ७, सातारा ६, जालना ३, नागपूर ६ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३५ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २ मृत्यू पुणे १ आणि सातारा १ असे आहेत.
 
मंगळवारी  २,५५४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १९,६१,५२५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७४ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,५०,५४,९९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,४८,८०२ (१३.६१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६७,६९४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,८०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.