दक्षिण आफ्रिका ‘मेकर्स’ की ‘चोकर्स’...?
विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीसाठी दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका एकमेकांसमोर उभे ठाकले असून दक्षिण अफ्रिका ‘चोकर्स’ ठरणार की हा सामना जिंकून मेकर्स ठरणार याबाबत जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजीची भिस्त डिव्हिलियर्स व हाशिम अमला यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे; तर डेल स्टेन गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिका संघात दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे, पण प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये हे खेळाडू लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरतील का? हा लाखमोलाचा प्रश्न आहे.