भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना, सिडनीला युद्धभूमीचे स्वरूप
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना सिडनीच्या मैदानावर होणार हे निश्चित झाल्यापासून या मैदानाची खेळपट्टी रणभूमी नव्हे, तर जणू युद्धभूमी ठरू लागली आहे. काही दिवसांपासून या मैदानाच्या खेळपट्टीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
आयसीसीच्या मैदान समितीचे प्रमुख अँडी टकिन्सन यांनी सिडनीच्या खेळपट्टीची बारकाईने पाहणी केली. त्यांचे निरीक्षण निर्णायक ठरू शकते.
सिडनीची खेळपट्टी परंपरेनुसार फिरकीस साथ देणारी आहे, पण या सामन्यासाठी ती वेगवान गोलंदाजांना साह्य करणारी असावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू करीत आहे. या खेळपट्टीवर गवत ठेवा असे मॅक्सवेल म्हणत आहे, तर जेम्स फॉकनर याच खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेचे फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर आणि जेपी ड्युमिनी यांनी श्रीलंकेची कशी वाताहत केली होती, याची आठवण देत आहेत.