गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (14:46 IST)

Ind vs Ban :विराट कोहलीने मागितली रवींद्र जडेजाची जाहीर माफी

Ind vs Ban: विश्वचषक 2023 मध्ये आज पुण्याच्या मैदानावर एक अतिशय प्रेक्षणीय सामना खेळला गेला. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव करत सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने भारतीय संघासमोर 257 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
 
टीम इंडियाने शानदार फलंदाजी करत 41.3 षटकात सामना जिंकला. भारताकडून अनुभवी फलंदाज विराट कोहलीने 104 धावांची शानदार नाबाद शतकी खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीराचा किताबही देण्यात आला.
 
विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्याच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. त्याने 103 धावांची शानदार शतकी खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीराचा किताब मिळाला. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावल्यानंतर त्याने रवींद्र जडेजाची माफी मागितली.
 
कोहली सामन्यांनंतर म्हणाले , जडेजा ने या सामन्यात अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. त्याने विकेट्स ही मिळवल्या.त्याने अफलातून कॅचही  पकडला.  

या सामन्यात त्याने मोलाच्या विकेट्सही  मिळवले .त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळू शकला असता. पण शतकामुळे त्याच्याकडून मी सामनावीर हा पुरस्कार हिरावून घेतल्यामुळे मी त्याची माफी मागतो. मित्रा मला माफ कर.
 




 Edited by - Priya Dixit