बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. ओळख क्रिकेटपटूंची
Written By राकेश रासकर|

मोहम्मद अझहरूद्दीन

नाव : मोहम्मद अझहरूद्दीन
जन्म : ८ फेब्रुवारी १९६३, हैदराबाद
देश : भारत
कसोटी पदार्पण : भारत वि. इंग्लंड, कोलकता, १९८४
वन डे पदार्पण : भारत वि. इंग्लंड, बंगळूर १९८५
शैली : उजव्या हाताचा फलंदाज व फिरकी गोलंदाज

पदार्पण करताच सलग तीन कसोटी शतकांचा विक्रम करणारा भारताचा हा महान क्रिकेटपटू. त्याचा हा विक्रम अद्याप कोणत्याही क्रिकेटपटूला मोडता आलेला नाही. सौरव गांगुलीनंतर तो भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत १०० हून जास्त एकदिवसीय सामने भारताने जिंकले. मनगटाच्या सहाय्याने चेंडू भिरकावून देण्याची त्याची शैली प्रेक्षणीय होती. तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता. मात्र सामने निकाल निश्चिती प्रकरणात त्याचे नाव आले व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्यावर आजन्म बंदी घातली. त्यामुळे त्याची क्रिकेटची कारकिर्द संपुष्टात आली.

पुरस्का
विस्डेन सर्वोत्तम क्रिकेटपटू १९९१

कसोटी
सामने - ९९
धावा - ६२१५
सरासरी - ४५.०३
सर्व्वोत्तम - १९९
१००/५० - २२/२१
बळी - 00
सर्वोत्तम - 00
झेल - १०५

वन डे
सामने - ३३४
धावा - ९३७८
सरासरी - ३६.९२
सर्वोत्तम - १५३
१००/५० - ७/५८
बळी - १२
सर्वोत्तम - ३-१९
झेल - १५६.