रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (12:35 IST)

Datta Jayanti 2022 Wishes Marathi दत्त जयंतीच्या शुभेच्छा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दत्त जयंतीच्या खास शुभेच्छा. 
 
श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
अवधूतचिंतन श्री गुरूदेवदत्त
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन
मी तूपणाची झाली बोळवण, एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो 
आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
गुरूवीण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
भीती कशाची जेव्हा दत्त उभा पाठिशी
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः
 
आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा!
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
त्रिमूर्ती हा अवतार
दत्तरूपी साकार
त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर 
होता साक्षात्कार घडतो चमत्कार
गुरूमाऊली चरणी माझा नमस्कार
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा 
नेति नेति शब्द न ये अनुमाना 
सुरवर-मुनिजन योगी समाधी न ये ध्याना
 
सर्वांना दत्त जयंतीच्या मनःपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा
 
दिगंबरा दिगंबरा
श्री दत्तगुरु दिगंबरा
विश्वंभर औदुंबरा
दयाघना हे करूणाकरा
 
दत्त येऊनी उभा ठाकला, भावे साष्टांगेसी प्रणिपात केला 
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्ममरणाचा फेरा चुकवीला
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा