1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. दीपावली
Written By वेबदुनिया|

धनत्रयोदशीचे खास मुहूर्त

WD
आज धनत्रयोदशीनिमित्त सायंकाळी दागदागिने, द्रव्य, गणेश, विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग, द्रव्यनिधी आदी देवदेतांचे पूजन करून नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. वसुबारस मागोमाग येणारा दिवाळी सप्ताहातील महत्त्वाचा सण म्हणजे धनत्रयोदशी.

आज सांयकाळी घरोघरी नागरिक धनलक्ष्मीचे पूजन करतात. देवदेवतांचे पूजन झाल्यावर पायसचा (खीर) नैवेद्य दाखविण्यात येतो. आजच 'यमदीपदान' करण्याची पद्धत आहे. अवेळी येणार्‍या संकटापासून सुटका व्हावी, यासाठी 'दीपदान' करण्याची श्रद्धा आहे व्यापारीवर्गात 'धनतेरस' या नावाने धनत्रयोदशी साजरी केली जाते. पुढील आर्थिक वर्ष निर्वेध उलाढालींचे व्हावे या उद्देशाने बाजारपेठांत कुबेरपूजन करण्यात येते, अशी पद्धत आहे.

धनत्रयोदशीचे खास मुहूर्त

प्रातः 07.30 ते 09.00 लाभ

प्रातः 09.00 ते 10.30 अमृत

दुपारी 12.00 ते 01.30 शुभ,

रात्री 09.00 ते 10.30 लाभ.

रात्री पूजा करणार्‍या लोकांसाठी रात्री 12.00 ते 01.30 शुभ व 01.30 ते 03.00 अमृत.

अभिजित मुहूर्त- प्रात: 11.47 ते दुपारी 12.14 व सायंकाळी 05.29 ते 05.35 गौ-धुलि बेला.

अहोरात्री पूजा करणार्‍या लोकांना सिद्धी प्राप्तीसाठी -

रात्री 12.58 ते 03.10 सिंह-लग्न.