बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (17:41 IST)

20 रुपयात ही एक वस्तू 1 खरेदी करा देवी लक्ष्मी कायमची घरात थांबेल

lakshmi stotram
20 रुपयांच्या सोप्या उपायाने आपण देवी लक्ष्मीला कायमचं स्वत:च्या घरी थांबवू शकता-
 
देवी लक्ष्मी अगदी सहज प्रसन्न व्हावी यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. फक्त 20 रुपयांच्या सोप्या उपायाने तुम्ही लक्ष्मीला तुमच्या घरी कायमचे थांबवू शकता...
 
* धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी मीठ विकत घेऊन घरी आणा आणि स्वयंपाकासाठी वापरा, यामुळे वर्षभर लक्ष्मीची कृपा राहते. दिवाळीत रोज मीठ टाकलेल्या पाण्याने लादी पुसल्याने गरिबी दूर होते. याशिवाय घराच्या ईशान्य कोपऱ्यात भांड्यात किंवा डब्यात थोडे मीठ ही ठेवता येतं. यामुळे नकारात्मकता दूर होते आणि संपत्तीचे साधन प्राप्त होतात.
 
* धनत्रयोदशीच्या दिवशी अख्खे धणे खरेदी करा, दिवाळीच्या रात्री लक्ष्मीसमोर हे धणे ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी एका भांड्यात धणे पेरा. त्यातून हिरवीगार रोपे निघाली तर आर्थिक स्थिती मजबूत राहते, अशी धारणा आहे. रोप पातळ असल्यास सामान्य उत्पन्न मिळतं. पिवळे व आजारी रोप बाहेर आले तर आर्थिक अडचणींना सामोरा जावं लागू शकतं, अशी समज आहे.
 
* धनत्रयोदशीच्या दिवशी कवड्या खरेदी करुन आणा आणि अखंड संपत्ती मिळवण्यासाठी दिवाळीच्या रात्री महालक्ष्मीची षोडशोपचार पूजा करून केसराने रंगवलेल्या कवड्या देवीला अपिर्त करा. नंतर या कवड्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा.
 
* तुपात कमळ गट्टे मिसळून, लक्ष्मीचा यज्ञ किंवा हवन केल्याने माणूस राजासारखे जीवन जगतो. याशिवाय लक्ष्मी देवीला 108 कमळ गट्टांची माळ अर्पण केल्याने व्यक्तीला स्थिर लक्ष्मी प्राप्त होते. धन आणि आशीर्वादासाठी घरामध्ये कमळाची माळ ठेवा.
 
* शुभ मुहूर्त पाहून बाजारातून पिवळी हळद किंवा काळी हळद गुठळ्यांसह घरी आणावी. या हळदीची कोऱ्या कपड्यावर स्थापना करुन पूजा करावी.
 
लोक श्रद्धेनुसार लाल रंगाच्या कपड्यात धणे, हळद, कमळ, गुळ आणि मिठाचे खडे बांधून गुंडाळावे. लक्ष्मी मंदिरात गेल्यानंतर ही गाठोडी देवी लक्ष्मीच्या पायाला स्पर्श करून तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावी, घर किंवा व्यवसायात कधीही पैशाशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत.