सोमवार, 16 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दिवाळी 2024
Written By
Last Updated : सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 (21:36 IST)

Dhanteras Wishes in Marathi : धनत्रयोदशी मराठी शुभेच्छा

dhanteras 2021
1 तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो
आप्तेष्ठांची सदैव साथ असो
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!
 
2 धनतेरस आपल्यासाठी समृद्धी आणि लाभ घेऊन येवो.. 
शुभ धनतेरस!
 
3 धनत्रयोदशीच्या निमित्ताने
आपणास व आपल्या कुटुंबास
धन आणि आरोग्य लाभो हीच सदिच्छा
शुभ दीपावली!
 
4 धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
5 धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा
 
6 धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची
करोनी औचित्य दिपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची...
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा
 
7 लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा
घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा
 
8 धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची
आणि भरभराटीची जावो
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा
 
9 धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी
कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी
फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
10 धनत्रयोदशीचा शुभ दिवस तुम्हाला जगातील सर्व चांगुलपणा लाभो! 
तुम्हाला निरोगी, श्रीमंत आणि आनंदी आयुष्यासह वर्षाव करुन द्या
धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा
 
11 धनतेरसच्या दिव्य दिवशी
देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे 
तुम्हाला आनंद आणि चांगले आरोग्य मिळावे
धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा
 
12 धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो 
आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
 
13आपल्या सर्वांना सुखी-समाधानी आरोग्य लाभू दे, 
हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
 
14 लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा,
आंनदाने सजल्या आज दाही दिशा..
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी आपणास,
मनःपूर्वक शुभेच्छा..!
 
15 आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

Edited By- Priya Dixit