गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (15:44 IST)

Diwali 2021 दिवाळीची साफसफाई करताना आपल्यावर पाल पडणे फायदेशीर की हानीकारक? जाणून घ्या

दिवाळी सण जवळ आला आहे. घरांमध्ये दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू झाली आहे. दिवाळीचा सण लक्ष्मी देवीशी संबंधित आहे. या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळते. दिवाळीला लक्ष्मीचे स्वागत केले जाते. त्यामुळे घराची विशेष साफसफाई केली जाते. साफसफाई करताना आपल्यावर पाल पडल्यास त्याचा अर्थ काय, जाणून घेऊया.
 
शकुन शास्त्रानुसार, अंगावर पाळ पडणे शुभ आहे की अशुभ हे पाल शरीराच्या कोणत्या भागावर पडली आहे यावरून ठरवले जाते. असे मानले जाते की जर पाळ तुमच्या वरून खाली पडून शरीराच्या डाव्या बाजूला पोहोचली तर ते एक चांगले चिन्ह आहे. यामुळे संपत्ती मिळते. दुसरीकडे, मानेवर पाल पडणे हे शत्रूंच्या नाशाचे लक्षण आहे. यासह इतर काही गोष्टी देखील सांगितल्या आहेत-
 
मान सन्मान वाढतो
साफसफाई करताना पाल डोक्यावर पडली तर ते खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की याने राज्यात सन्मान प्राप्ती होते. याने पदोन्नती, सन्मान आणि आदर वाढतो. या सोबत जर नोकरी असेल तर त्याला नोकरीत किंवा कामात विशेष यश मिळते.
 
आर्थिक लाभ
जर पाल कपाळावर पडली तर मालमत्ता मिळण्याची शक्यता वाढते. व्यक्तीला आर्थिक लाभ होतो. त्याचवेळी पाल उजव्या कानावर पडणे हे देखील दागिने मिळण्याचे लक्षण आहे. पाल डाव्या कानावर पडणे म्हणजे वय वाढणे. दुसरीकडे, जर पाल नाकावर पडली तर याचा अर्थ असा होतो की लवकरच नशीब घडणार आहे. म्हणजेच नोकरी किंवा व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. नाभीवर पाल पडल्यास मनोकामना पूर्ण होतात.