गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑक्टोबर 2019 (10:32 IST)

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर करा राशीनुसार खरेदी, भाग्य उजळेल

मेष- मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी शेअर, केमिकल, चामड्याच्या वस्तू, लोखंडी संबंधित कामा गुंतवणूक करणे टाळावे. आधीपासून गुंतलेला पैसा अडकलेला असल्यास मंगळवारी हनुमानाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
 
वृषभ- या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र चंचल ग्रह आहे चंद्र या राशीत उच्च असल्याने या जातकांनी धान्य, कपडा, चांदी, साखर, तांदूळ सौंदर्य सामुग्री, परफ्यूम, दूध आणि दुधाने तयार पदार्थ, प्लास्टिक, खाद्य तेल, आटो पार्टस, ऑटो पार्ट्स, कपडे संबंधी शेअर आणि रत्नांमध्ये गुंतवणूक केल्याने फायदा होईल. आधीपासून पैसा अडकला असल्यास पौर्णिमेला चंद्र देवाला तुपाचा दिवा लावावा.
 
मिथुन- या राशीचा स्वामी बुध आहे. बुध चंद्राला आपला शत्रू समजतो. बुध व्यापार करणार्‍यांना लाभ देणारा ग्रह आहे. या राशीच्या जातकांनी सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचं ठरेल. या व्यतिरिक्त कागद, लाकूड, पितळ, गहू, डाळी, कपडा, स्टील, प्लास्टिक, तेल, सौंदर्य सामुग्री, सिमेंट, खनिज पदार्थ, पशू, पूजन सामुग्री, वाद्य यंत्र इतर व्यवसायात खरेदी करणे आणि त्यात गुंतवणूक केल्याने फायदा मिळेल. पांढरे वस्त्र दान केल्याने अडकलेला पैसा परत मिळेल.
 
कर्क- कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. ही रास व्यवसायासोबत नोकरीत देखील यशस्वी ठरते. ही रास असणार्‍यांनी चांदी, तांदूळ, साखर आणि कपडा उत्पाद करणार्‍या कंपनीचे शेअर, प्लास्टिक, धान्य, लाकूड, बॅनर, केबल, तार, सिनेमा, खाद्य सामुग्री, अत्याधुनिक उपकरण, मुलांच्या खेळणी खरेदी करणे किंवा फायनेंस कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. गणपतीला लाडवाचा किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवल्याने अडकलेला पैसा परत मिळेल.
 
सिंह- या राशीचा स्वामी सूर्य असून हे लोकं स्वत:चे कार्य किंवा व्यवसायात यश प्राप्त करतात. नोकरी यांची आवड नाही. यांच्यासाठी सोनं, गहू, कपडा, औषधं, रत्न, सौंदर्य सामुग्री, अत्तर, शेअर आणि प्रॉप्रर्टीत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तकनीकी उपकरण, वाहन, सौंदर्य सामुग्री, सिनेमा, प्लास्टिक, केबल तार, इलेक्ट्रॉनिक्स, कागद, खाद्य पदार्थ, लाकडाचे समाना, सेनेत निर्यात करणे फायदेशीर ठरेल. हनुमानाला चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने अडकलेलं धन परत मिळेल.
 
कन्या- या राशीचा स्वामी बुध आहे. या जातकांनी शिक्षा, सोनं, औषधं, केमिकल, फर्टीलाइजर्स, चामड्याने तयार समाना, शेती, शेतीचे उपरकणे, यात कार्य केल्याने यश मिळेल. गुंतवणूक देखील फायदेशीर ठरेल. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवल्याने अडकलेला पैसा परत मिळेल.
 
तूळ- या राशीचा स्वामी शुक्र आहे. शनी या राशीत उच्च असल्यामुळे या राशीच्या जातकांनी लोखंड, सिमेंट, स्टील, औषधं, केमिकल, चामडं, फर्टीलाईजर्स, कपडा, तार, स्टील, कोळसा, रत्न, आधुनिक यंत्र, तेल यात गुंतवणूक किंवा खरेदी केली जाऊ शकते. सूर्याला दूध अर्पण करून अडकलेला पैसा मिळवता येईल.
 
वृश्चिक- या राशीचा स्वामी मंगळ आहे. या जातकांनी जमीन, घर, दुकान, शेती, सिमेंट, रत्न, खनिज, शेती आणि मेडिकल उपकरण, पूजन सामुग्री, कागद, कपड्यांमध्ये गुंतवणूक किंवा खरेदी केल्याने लाभ होऊ शकतो. मंगळवारी हनुमान चालीसाचा पाठ करून अडकलेला पैसा मिळवता येईल.
 
धनू- या राशीचा स्वामी गुरु आहे. गुरु व्यापार्‍यांना लाभ देणारा ग्रह आहे. विशेष म्हणजे सोनं आणि धान्याचा व्यापार करणार्‍यांसाठी. या राशीच्या लोकांनी गुंतवणूक करण्यासाठी या वस्तूंवर लक्ष केंद्रित करावं. दागिने, रत्न, सोनं, धान्य, कापूस, चांदी, साखर, तांदूळ, औषधं, सौंदर्य सामुग्री, दुधाने तयार पदार्थ, पशूंचा व्यवसाय इतर. मोहरीच्या तेलाचं दान केल्याने अडकलेला पैसा परत मिळेल.
 
मकर- या राशीचा स्वामी शनी आहे. या जातकांनी लोखंड, स्टील, केबल, तेल, खाद्य सामग्री, इलेक्ट्रॉनिक्स सामान, यंत्र, खनिज पदार्थ, शेती उपकरणे, वाहन, मेडिकल उपकरणे, वस्त्र, अत्तर, स्टील, सौंदर्य सामुग्री, सिनेमा, नाटक इतरामध्ये व्यवसाय करणे, गुंतवणूक केल्याने लाभ मिळेल. चिंच दान केल्याने अडकलेला पैसा परत मिळेल.
 
कुंभ- या राशीचा स्वामी शनी आहे आणि या लोकांनी मकर रास प्रमाणेच लोखंड, स्टील, केबल, तेल, खाद्य सामग्री, इलेक्ट्रॉनिक्स सामान, यंत्र, खनिज पदार्थ, शेती उपकरणे, वाहन, मेडिकल उपकरणे, वस्त्र, अत्तर, स्टील, सौंदर्य सामुग्री, सिनेमा, नाटक इतरामध्ये व्यवसाय करणे, गुंतवणूक केल्याने लाभ मिळेल. आलं दान केल्याने अडकलेला पैसा परत मिळेल.
 
मीन- या राशीचा स्वामी गुरु असून या जातकांनी गुंतवणुकीसाठी दागिने, रत्न, सोनं, धान्य, कापूस, चांदी, साखर, तांदूळ, औषधं, सौंदर्य सामुग्री, दुधाने तयार पदार्थ, पशू संबंधी व्यवसाय केल्याने किंवा त्यात गुंतवणूक केल्याने फायदा मिळेल. दुर्गा चालीसाचा पाठ केल्याने अडकलेला पैसा परत मिळेल.