बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. ऑनलाईन दिवाळी अंक
Written By वेबदुनिया|

दिवाळीच्या दिवशी

- मधुसुदन शाह

WD
दिवाळीच्या दिवशी
दरापुढे सडा
ताईच्या रांगोळीने येणार्‍याची तर्‍हा
एक पाय लांबवर दुसरा पायरीव
ताईची, तिच्या मैत्रिणीची मदार रांगोळीवर
छोटे छोटे ठिपके, छोटे छोटे बिंदू
कधि रेघांनी जुळतात, ताईच्या मनांत
रेंगाळतात-गालीच्याचा आकार
रांगोळी साकार कुठे त्रिकोण
कुठे चोकोन, कुठे सरळ तर कुठे
वाकलेली-सगळे रांगांनी सजलेले
जादुचा गालीचा लागला हसायला
अन् ताईला काहीतरी पुसू लागला.