मंगळवार, 10 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By

नारळाच्या वड्या

साहित्य: 1 नारळ शुभ्र खवलेलं, 350 ग्रॅम साखर, तूप, वेलची पूड
 
कृती: कढईत दोन चमचे तूप घालून गरम करा. त्यात खवलेला नारळ घाला. मंद आचेवर परतून घ्या. दोन ते तीन मिनिटानंतर साखर घालून परता. मंद आचेवर ढवळा. स्वादानुसार वेलची पूड घाला. हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागते. तूप लावलेल्या ताटात मिश्रण ओता. वाटीच्या मदतीने मिश्रण पसरवून घ्या. मिश्रण गरम असतानाच हलक्या हाताने वड्या पाडा. मिश्रण थंड झाल्यावर वड्या वेगवेगळ्या करा.