सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Updated : रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (13:06 IST)

Diwali 2022 Special Faraal :तांदळाची खमंग कडबोळी

kadboli recipe
दिवाळीत फराळ करतात. फराळात अनारसे, चकली, चिरोटे, खारी, गोड शंकरपाळी, चिवडा करंज्या ,एवढे सर्व पदार्थ केले जातात. त्यात कडबोळीचा देखील समावेश असतो. कडबोळी बाजरी, ज्वारीची केली जाते. आज आपण तांदुळाची कडबोळी कशी करायची हे जाणून घेऊ या. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
तांदळाची कडबोळी करण्यासाठी सर्वप्रथम तांदुळाला शिजवून मऊ भात तयार करून घ्या. 
तांदुळाची किंवा भाताची कडबोळी करण्यासाठी साहित्य जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
2 वाटी भात, 1 कप बेसन, 2 चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ, तिखट, धणेपूड, जिरेपूड, हिंग, मीठ, हळद, तीळ आणि तेल.
 
कृती- 
सर्वप्रथम शिजवलेला भात बारीक दळून घ्या. नंतर एका पसरट परातीत ज्वारीचं पीठ, गव्हाचं पिट, बेसन, तिखट, हळद, हिंग, तीळ, धने-जिरेपूड, आणि गरम तेलाचं मोहन घालून गोळा मळून घ्या. त्यात पाणी घालू नका. भाताचा घट्ट गोळा बनेल एवढे पीठ घालून गोळा बनवा नंतर हाताला तेल लावून कडबोळ्या बनवून घ्या. सर्व गोळ्याच्या कडबोळ्या तयार करून घ्या. 
आता कढईत तेल तापत ठेवा. आणि सर्व कडबोळ्या मध्यम आचेवर तळून घ्या. कडबोळी खाण्यासाठी तयार. 
 
Edited By- Priya Dixit