चण्याच्या डाळीचे लाडू
साहित्य : चण्याची डाळ - १ वाटी साखर, १ ते सव्वा वाटी नारळ खवलेला, पाऊण वाटी तूप, ६-७ चमचे दूध, १/२ वाटी काजू, बदाम, पिस्ता यांचे काप विलायची पूड -१ चमचा केशरपूड.
कृती : चण्याची डाळ ४-५ तास भिजवून ठेवावी नंतर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावी. कढईत तूप गरम करून वाटलेली डाळ गोल्डन ब्राउन होई पर्यंत परतून घ्यावी. डाळ परतल्यावर त्यात नारळ आणि दूध घालून चांगले परतून घ्यावे. दुसऱ्या पातेल्यात साखर घेवून त्यात ३-४ चमचे पाणी घालून २ तारी पाक करावा. त्यात सर्व ड्राय फ़्रुटस, वेलची आणि केशरपूड घालावी. परतलेली डाळ पाकात घालावी आणि ढवळावी. गार झाल्यावर लाडू वळावे.